भारत बंद जिल्ह्यात फसला

जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद
भारत बंद जिल्ह्यात फसला

जळगाव | jalgaon

शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात (Against anti-farmer laws) तसेच केंद्र शासनाकडून केल्या जाणार्‍या खासगीकरणाविरोधात(Privatization) जिल्हा कॉंग्रेस कमिटी (District Congress Committee) व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे (Nationalist Congress Party)सोमवारी संपुर्ण भारत बंदची हाक (India closed) देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला नागरिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने जिल्ह्यात भारत बंद प्रयत्न फसल्याचे (fell)चित्र दिसून आले.

शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात तसेच केंद्र शासनाकडून केल्या जाणार्‍या खासगीकरणाविरोधात जिल्हा कॉंग्रेस कमिटी, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रत्येक तालुका स्तरावर सोमवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु नेहमीप्रमाणे व्यापार्‍यांनी सकाळीच आपली दुकाने खुली करीत व्यापाराला सुरुवात केली होती.

मात्र आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर आंदोलकांनी संपुर्ण बाजारपेठांसह व्यापारी संकुलात जावून व्यापार्‍यांना दुकाने बंदसाठी आवाहन केले. यात व्यापार्‍यांनी आंदोलक व्यापारी संकुलात असे पर्यंत आपली दुकाने बंद केली. मात्र ते गेल्यानंतर पुन्हा व्यापार सुरु झाल्याने जिल्ह्यात आंदोलनाचा प्रयत्न फसल्याचे दिसून आले.

तासभरात आटोपले भारत बंदचे आंदोलन

आंदोलक बाजारपेठेसह व्यापारी संकुलात जावून व्यापार्‍यांना आपली दुकाने बंद करायला लावित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. यावेळी व्यापार्‍यांनी काही काळ दुकाने बंद केली ल्याने शहरातील सर्वच बाजारपेठा सकाळी बंद झाल्या. मात्र आंदोलक माघारी होताच काही वेळातच बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे सुमारे तासभरच आंदोलकांनी आंदोलन केल्यानंतर ते देखील माघारी फिरले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com