पारोळा : बोरी नदीवरील पुलाची उंची वाढवा!
जळगाव

पारोळा : बोरी नदीवरील पुलाची उंची वाढवा!

शिवभक्त के.बी.रणधीर यांनी केली मागणी

Rajendra Patil

पारोळा - प्रतिनिधी

तालुक्यातील बहादरपूर-शिरसोली दरम्यान असलेल्या बोरी नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी शिवभक्त के.बी रणधीर यांनी केली आहे.

तालुक्यातील तामसवाडी येथे असलेल्या बोरी धरणावरील उगमस्थानावर असलेले भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने धरणात मोठा साठा जमा होऊन धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

बोरी नदी दुथडी वाहत असताना बहादरपुर- शिरसोदे दरम्यान असलेल्या बोरी नदीवरील फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे पारोळा पूनगाव, शेवगे बुद्रुक, कंकराज, महाळपुर, बहादरपूर, शिरसोदे, जिराळी, इंदवे, भोलाणे, पिंपळकोठा, वसंतनगर, वडगाव, सुमठाणे, अंबापिंपरी, या पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे तर भिलाली कोळपिंप्री ग्रामस्थ हे सडावन मार्गे जाऊ येऊ शकतात तर बहादरपुर साईटचा गावांना पिंपळ भैरव मोंढाळे प्र.अ.मार्गे पारोळा कडे जावे लागते तो सुमारे दहा किमी चा फेरा पडतो तसेच त्या मार्गाने वाहनेही मिळत नाही म्हणून या बोरी नदी वरील फरशी फुलाची पंचविस ते तीस फुट उंची वाढवावी व खाली पाईप न टाकता सिमेंट कमानी व्हाव्यात अशी मागणी समाजसेवक के.बी रणधीर बहादरपुर यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com