लॉकडाऊनच्या काळातील तिकिट कॅन्सलेशनमध्ये वाढ

सहा महिन्यांवरुन ९ महिन्यांपर्यंत मुदत वाढविली
लॉकडाऊनच्या काळातील तिकिट कॅन्सलेशनमध्ये वाढ

भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal

लॉकडाऊनच्या कालावधीतील प्रवासाची आरक्षित केलेली तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकी वरून त्याचा परतावा मिळवण्यासाठीच्या कालमर्यादेत नऊ महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वेच्या नियमित वेळापत्रकातील रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांसंदर्भातच हे लागू आहे.

रेल्वे मंत्रालयाने प्रवासाच्या २१ मार्च ते ३१ जुलै २०२० दरम्यान या कालावधीसाठी आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळवण्यासाठी घातलेली कालमर्यादा प्रवासाच्या दिवसांपासून सहा महिने होती. ती आता वाढवून नऊ महिन्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. जर आरक्षित तिकीट १३९ मधून व आयआरसीटीसी संकेतस्थळावरून रद्द केले गेले असेल तर असे तिकीट प्रवासाच्या दिनांकापासून नऊ महिन्यात आरक्षण खिडकीवर परत करता येईल.

प्रवासाच्या दिवसापासून सहा महिने उलटून गेल्यामुळे, अनेक प्रवाश्यांनी आपली मूळ तिकिटे विभागीय रेल्वेच्या दावा कार्यालयात टीडीआर किंवा साध्या अर्जासहित जमा केली असतील. प्रवाश्यांना अश्या पीआरएस काउंटर तिकीटांचा परतावा देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याआधी, कोविड-१९ परिस्थितीत तिकीटे रद्द करणे तसेच त्यांचा परतावा देणे याबाबत सविस्तर मार्गदर्शक नियमावली जारी केली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com