जळगाव - Jalgaon

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दि.21 ते 26 जानेवारी, 2021 या कालावधीत जिल्ह्यात बालिका सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले

यावेळी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत प्रतिज्ञा घेण्यात येवून स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विनोद ढगे व त्यांच्या चमुने बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारीत पथनाटय सादर केले.

बालिका सप्ताहात बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारीत चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेबिनार, यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी यशकथा, पीसीपीएनडीटी कायद्याबाबत कार्यशाळा, मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलीच्या नावाने झाड लावणे, सेल्फी वुईथ डॉटर, कविता वाचन, घोषवाक्य इ. उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.