पुण्याच्या येरवडा कारागृहात 
सुनील झंवरचा मुक्काम

पुण्याच्या येरवडा कारागृहात सुनील झंवरचा मुक्काम

बीएचआर प्रकरणी न्यायालयीन कोठडी

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

बीएचआर घोटाळ्यातील BHR scam मुख्य सूत्रधार सुनिल झंवरची Sunil Zanwar पोलीस कोठडी आज संपली. दरम्यान, आज त्याला न्यायालयात court हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत judicial custody रवानगी केली.

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला 10 ऑगस्ट रोजी नाशिक येथून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली होती. त्यानंतर पथकाने त्याला पुणे येथे न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची 23 ऑगस्ट रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सुनिल झंवरने पोलीस चौकशीत घोटाळ्याशी संबंधित काही महत्वपूर्ण गोष्टी मान्य केल्या आहेत. तर अनेक गोष्टी नाकारल्या देखील आहेत. तसेच अनेक प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाने निदर्शनास आणून दिले होते. तर झंवरने मंगेश चव्हाणसह राजकीय व उद्योजकांसोबत त्याचे आर्थीक संबंध असल्याचे देखील मान्य केले आहे.

झंवरच्या कार्याल्यासह त्याच्या घराची तपासणी केले असता त्याठिकाणाहून जप्त केलेले कागदपत्र, शासकीय कार्यालयांचे शिक्के, आमदार, खासदारांचे लेटरपॅड आदी वस्तू त्याला दाखवून पडताळणी करून घेण्यात आल्या आहेत. मात्र त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली असल्याचे कळतेय. तसेच झंवरला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला याप्रकरणातील इतर संशयीतांप्रमाणे त्याचा मुक्काम देखील पुण्याच्या येरवडा कारागृहात राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com