चाळीसगाव : पावसाळा तोंडावर, नालेसफाई नाहीच..!

चाळीसगाव : पावसाळा तोंडावर, नालेसफाई नाहीच..!

शहरातील नाले कचर्‍याने तुडूंब भरले, सध्या विकास कामांपासून नगरसेवक लॉकडाऊन, यंदाच्या न.पा.च्या निवडणुकीत अनेकांची होणार सफाई

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

हवामान खात्याने यंदा १ जून पासून पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाळा तोंडावर आला आहे, परंतू तरी देखील चाळीसगाव नगर परिषदेला नालेसफाई करण्यासाठी जाग आलेली दिसत नाही. शहरातील मोठ्या नाल्याची सफाई अद्याप करण्यात आलेले नाही. या नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे सध्यास्थिती नाले कचर्‍यानेे तुडूंब भरलेले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या नाल्यामध्ये पाणी साचून एखाद्याचा जीव जाण्यांची भिंती व्यक्त करण्यात येत आहे. न.पा.ने याचा गार्ंभीयाने विचार करुन त्वरित नालेसाफई करावी अशी मागणी नारिकांकडून करण्यात येत आहे.

चाळीसगाव शहराची लोकसंख्या जवळपास एक ते दिड लाखांच्या घरात आहे. शहाराचे नागरिकरण वाढत असून त्या मानाने शहरातील सांडपाण्याची व्यवस्थान अजुनही अनेक नवीन भागात नगरपरिषदेकडून करण्यात आल्याचे दिसत नाही. तर साडपाण्याच्या व्यवस्थेसाठी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून चार ते पाच मोठे नाले आहेत. या नाल्याची सफाई न.पा.कडून नियमित तर केलीच जात नाहीच, वर्षातून एकदा या नालेसफाईला मुर्हत मिळतो. यंदा पावसाळा तोंडावर आला आहे, तरीदेखील नगरपरिषदेला नालेसफाईसाठी अजुनही जाग आलेली दिसत नाही.

प्रभागातील नगरसेवक देखील सध्या प्रभागात दिसेनासे झाले आहेत. लॉकाडाऊनच्या नावाखाली त्यांनी स्वता;ला विकास काम न करण्यासाठी लॉकाडाऊन करुन घेतल्याचं बोलले जात आहे. फक्त नगरपरिषदेचे पथक शहरातील एखाद्या दुकानदारावर कारोनाचे निर्बंध तोडल्याप्रकरणी कारवाईसाठी गेल्यास, संबंधीत वार्डातील नगरसेवक त्या ठिकाणी येवून किवा फोनवरुन मोठ्या रुबाबात नगरपरिषदेच्या पथकास व पोलिसांना कारवाई करु नको म्हणून सांगत असल्याची चर्चा न.पा.चे पथक व पोलिसांमध्ये दबक्या आवाजात आहे.

शहरातील नालेसफाईची समस्य भंगीर आहे, तरी देखील नगराध्यक्ष व नूतन मुख्याधिकार्‍यांना देखील याबाबत गार्ंभीय दिसत नाही. शहरातील घाटरोडस्थित छाजेड ऑईल मिल परिसरातील इस्मालपुरा भागातील शहारतील सर्वात मोठा नाला आजघडीला कचर्‍याने तुडूंब भराला आहे. या नाल्याची सफाई व्हावी म्हणून समाजीक कार्यकर्ते विजय शर्मा यांनी न.पा.ला.गेल्या १० ते १५ दिवसांपूर्वी पत्र देखील दिले होते. परंतू तरी देखील न.पा.ने ही बाब गार्ंभीयाने घेतलेली दिसत नाही. तसेच शहरातील इतर भागातील लहान-मोठे नाल्याची देखील सफाई झालेली दिसत नाही. फक्त काही भागात फोेटोसेशनपूर्ती गटारीची सफाई मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

परंतू त्यानतंर शहातील कुठल्याही लहान-मोठ्या नाल्याची सफाई करण्यात आली. आरोग्य सभापतीनी नुकेत, त्यांच्या प्रभागात विकास कामांचे उद्घाटन केले, परंतू न.पा.च्या नालेसफाईच्या सूचना देण्यासाठीचा मुर्हत त्याना कधी मिळेल असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही, नालेसफाई झाली नसल्याने या नाल्यांमध्ये प्रचंड घाण साचलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार नाही. परिणामी नाल्यांमध्ये पाणी साचून एखाद्या लहान किवा मोठ्याचा जीव जावू शकतो. नाळेसफाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून येणार्‍या न.पा.च्या निवडणुकीत त्यांनी काही विद्यामान नगरसेवकांचा आपल्या प्रभागातूनच सफाई करण्याचा चंग बांधला असल्याची चर्चा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या भागातील नाला कचर्‍याने तुंटूब भरला आहे. यासंबधी नगरसेवकाना वेळोवेळी तोडी समस्या सांगीतली आहे. तसेच नगरपरिषदेला लेखी निवेदन दिले आहे. तरी देखील नालेसफाई केली जात नाही. परंतू आता मला स्वता; नालेसफाईसाठी नाल्यात उतरावे लागणार आहे. तेव्हाच शहरातील इतर नाल्याच्या सफाईबाबत नगरपरिषदेला जाग येईल.

विजय मदनलाल शर्मा, समाजीक कार्यकर्ता

प्रभागातील इतर कामांसाठी जेसीबी वापरण्यात येत आहे. त्यामुळे नालेसफाईला विलंब झाला आहे. नालेसफाईबाबत मी कर्मचार्‍यांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीच संपूर्ण शहरातील लहान-मोठ्या नाल्याची सफाई केली जाईल, तसेच इतर मोठ्या गटारींची देखील स्वच्छता करण्यात येणार आहे. याबाबत मुख्याधिकार्‍यांशी देखील चर्चा झाली आहे.

सौ.आशालता विश्‍वास चव्हाण, नगराध्यक्षा

नालेसाफाईसाठी जेसीबी नसल्यामुळे नाले सफाईला विलंब होत आहे. न.पा.च्या कर्मचार्‍यांकडून नालेसफाई शक्य नाही. परंतू शहरात फवारणी व इतर स्वच्छतेची कामे नियमित चालू आहेत. कर्मचारी अतिशय चांगल्या पध्दतीने शहराची स्वच्छता करीत आहेत. कारोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता ते काम करीत आहेत. जेसीबी उपलब्ध झाल्याबरोबर त्वरित नालेसफाई करण्यात येईल.

सौ.सायली रोशन जाधव, आरोग्य सभापती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com