बीएचआर प्रकरणात आ. मंगेश चव्हाण आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर

बीएचआर प्रकरणात आ. मंगेश चव्हाण आर्थिक
 गुन्हे शाखेच्या रडारवर

जळगाव Jalgaon। प्रतिनिधी

बीएचआर BHR प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनिल झंवरचे Chief facilitator Sunil Zanwar व माझे कुठल्याही प्रकारचा आर्थिक संबंध Economic relations नसल्याचे खंडण आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले होते. परंतु तपासात आ. चव्हाण व झंवरचे आर्थिक संबंध Economic relations असल्याचे निष्पन्न झाले असल्याने आ. चव्हाण MLA Mangesh Chavan देखील आता आर्थिक गुन्हे शाखेच्या Economic Crimes Branch रडावर असल्याची शक्यता असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बीचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनिल झंवरच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यात झंवरने तपासात टेंडरमधील मालमत्ता कोणाच्या सांगण्यावरुन कोणासाठी खरेदी केली, त्यासाठी पैसा कसा उपलब्ध केला तसेच झंवरने आतापर्यंत 9 दिवसात सहकार्य करीत नसून केवळ उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

तपासाधिकार्‍यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास झंवर टाळाटाळ करीत असून तपासातील बाबी निष्पन्न करण्यासाठी पोलीस कोठडीत वाढवून मिळण्याची मागणी सरकारपक्षाने न्यायालयाला केली होती. त्यानुसार न्यायालयाने झंवरच्या पोलीस कोठडीत 23 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

तसेच सुनिल झंवरने तपासात टेंडर भरणारे व पतसंस्थेची मालमत्ता खरेदीसाठी ठेवदार राजेंद्र इंगोले, मधूकर झंवर व उषा मधुकर झंवर याच्या ठेव पावत्या स्वत: खरेदी करुन वर्ग केल्याचे मान्य केले आहे. तसेच कृणाल शाह याने साई सेवा पार्सल कंपनीचे सॉफ्टवेअर यापूर्वी बनविल्याचे व त्याच्यासोबत आर्थिक संबंध होते.

फरार झाल्यापासून झंवर हा इंदौर व नाशिक येथे राहीला असून त्याला नाशिक येथे घेवून जात तपास करण्यात आला आहे. तसेच इंदौर येथे अवसायक कंडारेच्या ओळखीच्या व्यक्तीकडे राहत सल्याचे त्याने कबूली दिली आहे.

ठेवी आणून देणारा माहेश्वरी शालेय पोषण आहाराचा ठेकेदार

कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्यासाठी ठेवी आणून देणारा एजंट आकाश माहेश्वरी हा शालेय पोषण आहाराचा ठेकेदार असल्याचे झंवर याने सांगितले. तसेच झंवरच्या कार्यालयात रमेश उमाळे हा टायपिंगचे तर सुनिल कलंत्री व दीपक शिंदे हे दोघ अकाऊंटचे काम करीत असून ते माझ्या सांगण्यानूसारच काम करीत असल्याचे झंवरने मान्य केले.

राजकीय पुढार्‍यांसोबत झालेत आर्थिक व्यवहार

सुनिल झंवरच्या कार्यालयासह घराच्या झडतीमधून अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पुराव्याच्या फॉरेन्सिक ऑडीटनुसार झंवरचे अनेक राजकीय पुढार्‍यांसोबत आर्थिक लागेबंध असल्याचे झंवरने कबूल केले आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली असून याप्रकरणी आणखी कोणाला अटक होणार याकडे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com