मुक्ताईनगर - प्रतिनिधी Muktainagar

स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन मतमोजणी स्थळी टेबलावर आणल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित गावचे प्रतिनिधी जमा होत आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जाळी किंवा सुरक्षितता दिसून येत नव्हते दोन बांबू लावल्यामुळे हात ईव्हीएम मशीन पर्यंत पोहोचत होते. यावरून महसूल प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत होता.

निकाल जाहीर करण्यासाठी तहसीलदार चार ते पाच फेर्या होऊन सुद्धा महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे तब्बल दीड तास उलटूनही एकाही फेरीचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. न करण्यामागे महसूल प्रशासनाचा हेतू काय याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारची माहिती तहसीलदार श्वेता संचेती यांनी देण्यास असमर्थता व्यक्त केल्याने तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मतमोजणीसाठी कोणत्याही प्रकारचे सुस्थितीत नियोजन न करता केवळ बांबू व लोखंडी खांब आडवे टाकून मतमोजणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रसंगी जाळ्यांचा वापर व पार्टिशन विभागणी टेबल निहाय विभागणी न करता अतिशय मोकळ्या वातावरणात मतमोजणी केली जात आहे त्यातच कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग व मास आणि सॅनिटायझर चा उपयोग देखील करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीवर शिवसेने ने आपल्या विजयाचा दावा केला असून पॅनल प्रमुख पंकज राणे यांच्या नेतृत्वात तब्बल सहापैकी पाच जागा शिवसेनेने जिंकल्या चा दावा केल्याने भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाचा खासदार रक्षा खडसे एवढेच नव्हे तर माजी महसूल मंत्री व नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या पॅनेलला ही जोरदार चपराक मारली जात आहे.