जळगावातील रस्त्यांच्या प्रश्नावर मनविसे मैदानात

मनपा आयुक्तांना दिला इशारा
जळगावातील रस्त्यांच्या प्रश्नावर मनविसे मैदानात

जळगाव : jalgaon

महानगरपालिका (Municipal Corporation) हद्दीत असलेल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. पावसाळ्यामध्ये या खड्डयांचा त्रास जळगावकरांना होत आहे. यामुळे रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) वतीने घोषणाबाजी करत मनपा आयुक्तांना निवेदन दिले.

रस्त्यांची कामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, योगेश पाटील, संदीप महाले, पंकज चौधरी, कुणाल पाटील, तुषार पाठक, अमोल वाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com