वाघुर नदी पात्रात अडकलेल्या महिला
वाघुर नदी पात्रात अडकलेल्या महिला|साकेगाव
जळगाव

वाघुर नदीत सासू-सून वाहिल्या

साकेगाव नजिकची घटना

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - Bhsawal

महामार्ग क्र.6 वर साकेगाव नजीक वाघूर नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहात सासू-सून वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली.

वाघूर धरणातून पाण्याचा प्रवाह नदीत सोडण्यात आला आहे, त्या प्रवाहात दोन्ही महिला वाहून गेल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाण्यात वाहून गेलेल्या सासू-सुनेचा शोध घेतला जात आहे.

सिंधूबाई अशोक भोळे (६५) आणि योगिता राजेंद्र भोळे (३५) या दोन्ही महिला आज सकाळी बांधण्यात आलेल्या नव्या पुलाकडे गेल्या होत्या, दोन्ही महिला दररोज या भागात जाऊन वाळू गाळण्याचे काम करत होत्या. त्यातील एका महिलेला बाहेर काढण्यात यश आल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com