जळगाव : आसोद्यात पतीने पत्नीला पेटविले

जळगाव : आसोद्यात पतीने पत्नीला पेटविले

जळगाव - तालुक्यातील आसोदा येथे आर्थिक आणि कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर ऑइल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. यात 30 वर्षीय महिला 50 टक्के भाजली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघं नणदांना पोलिसांनी अटक केली.

आसोदा येथे संतोष प्रकाश नन्नवरे, त्याची पत्नी कांचन, वडील, मुलगा, मुलीसह राहतात. या महिलेच्या घरी तिची नणद आशा शांताराम साळुंखे आणि सपना अमृत सोनवणे काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. घरात महिलेचे सासरे प्रकाश रामदास नन्नवरे हे आजारी आहेत. त्यांना भेटण्यासाठी महिलेे दीर व दिराणी आली आहे.

महिलेच्या सासर्‍याच्या नावावर बँकेत जमा असलेल्या रक्कमेवरुन नणदांनी सायंकाळी देखील वाद घातला. महिलेच्या माहेरी पाठवण्यासाठी तिचा पती व नातेवाईकांनी आग्रह धरला. तिला पतीने मारहाण देखील केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दवाखान्यात उपचार सुरू

ही महिला रात्री 10 वाजेच्या सुमारास घराच्या मागील बाजूस लघूशंकेसाठी गेली असता तिचा पती संतोष याने तिच्या अंगावर ऑइल फेकून पेटवून दिले. या घटनेमुळे महिलेने आरडाओरड केली. तिचा दिर व दिराणी आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला विझविले. तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

याबाबत महिलेने फिर्याद दिली. त्यावरुन तिचा पती संतोष प्रकाश नन्नवरे, नणंद सपना अमृत सोनवणे, आशा शांताराम सोळुंखे (शिवकॉलनी) व सपना अमृत सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com