प्रांताधिकारी दीपमाला चौरे
प्रांताधिकारी दीपमाला चौरे
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकार्‍यांसह एकाला लाच घेताना अटक

सव्वा लाखाची लाचेची मागणी भोवली

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon

येथील वादग्रस्त प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांचेसह एकाला वाळू व्यावसाईकाचे जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच घेताना....

लिपिक अतुल सानप
लिपिक अतुल सानप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले. एका वाळू व्यवसाईककडे बुलढाणा येथील पावत्या असताना देखील त्याचे दोन वाहने महसूल विभागाच्या पथकाने एमआयडीसी भागात पकडले होते हे वाहन सोडण्यासाठी प्रांताधिकारी चौरे यांनी २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान ताडजोडीअंती सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले होते ही रक्कम प्रांत दीपमाला चौरे व त्यांच्याच कार्यालयातील लिपिक अतुल सानप यांनी त्यांच्या पंटर मार्फत स्वीकारल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com