मान्यता काढण्याविरोधात प्राचार्य उच्च न्यायालयात
जळगाव

मान्यता काढण्याविरोधात प्राचार्य उच्च न्यायालयात

Balvant Gaikwad

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने भुसावळ व शहादा महाविद्यालयातील प्राचार्यांची मान्यता काढली होती. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात  संस्था व प्राचार्य औरंगाबाद खंडपीठात गेले. परंतु खंडपीठाने निर्णयास स्थगिती देण्यास नकार देत विद्यापीठाचा निर्णय जैसे थे ठेवला.

भुसावळ येथील प.क.कोटेचा महाविद्यालय व शहाद येथील नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक पाटील यांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही ते पदावर कायम होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पाच वर्षानंतर संस्थेने दुसर्‍या प्राचार्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते.

युजीसी नियमाचे पालन न झाल्यान विद्यापीठाने दोन्ही संस्थांना नोटीस बजावली. त्यानंतरही संस्थेकडून त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे विद्यापीठाने दोन्ही प्राचार्यांची मान्यता काढली. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधा कोटेचा महाविद्यालय व नंदुरबारचे प्राचार्य अशोक पाटील यांनी खंडपीठात धाव घेतली.

खंडपीठाने त्यांची याचिका दाखल करुन घेत विद्यापीठाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 जानेवारी रोजी ठेवली. न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी हा निर्णय दिला.

Deshdoot
www.deshdoot.com