एरंडोल तालुक्यात २८ करोना बाधित रुग्ण आढळले

तालुक्यातील बाधित रूग्णांची संख्या झाली ३७३
एरंडोल तालुक्यात २८ करोना बाधित रुग्ण आढळले

एरंडोल - श. प्र.- Erandol

एरंडोल तालुक्यात आज दि.१८ जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार २८ रुग्ण करोणा पॉझीटीव्ह आले आहेत. शहरातील काशी पुनमचंद नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, ओम नगर येथील ५५ वर्षीय महिला, आंबेडकर नगर येथील २४ व ८० वर्षीय महिला, गांधीपूरा येथील ७० वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, मेनरोड येथील ८१ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगी, जहांगीरपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष,५५ व २५ वर्षीय महिला, ३ वर्षाचा बालक, एका खाजगी हॉस्पिटल येथील २८ वर्षीय पुरुष, अमळनेर दरवाजा येथील ४५ वर्षीय महिला, इंद्रप्रस्थ नगर येथील ३५ वर्षीय पुरुष तसेच ग्रामीण भागातील फरकांडे येथील ५८ वर्षीय पुरुष,५५ वर्षीय महिला, धारागिर ६५ वर्षीय महिला, तळई प्राथमिक आरोग्य केंद्राचे ५५ व ४१ वर्षीय पुरुष, निपाने येथील ८० वर्षीय पुरुष, आडगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, सोनबर्डी येथील ३१ वर्षीय महिला व १३ वर्षीय बालक, खर्ची येथील १८ वर्षीय युवक, विखरण येथील ६६ वर्षीय पुरुष तर एक ६० वर्षीय महिला जळगाव रुग्णालयात तिचा पत्ता मिळाला नाही असे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान तालुक्यात आता एकूण ३७३ करोणा रुग्ण संख्या झाली असून यात २४५ शहरातील रुग्ण व १२७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. २६५ रुग्ण बरे झालेले असुन १६ रुग्ण मयत झाले आहेत. ९२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तालुक्यात एकूण १२५८ रुग्णांचे स्वाब घेण्यात आले आहेत. यात ९९७ नागरिकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर तालुक्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०५ टक्के आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com