सराफ दुकानात दोन महिलांनी ३८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबवली

सिसीटीव्ही मध्ये कैद झाल्या चोरी करणाऱ्या महिला
सराफ दुकानात दोन महिलांनी ३८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबवली

रावेर Raver

येथील हेडगेवार चौकात असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये Mahalakshmi Jewelers सोमवार दि.९ रोजी दुपारी पावणे चार वाजता दोन महिला दागिने खरेदी Buy jewelry करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या,या महिलांनी दुकानाचे संचालक नरेंद्र सोनार Director Narendra Sonar यांच्याकडे सोन्याच्या पोत दाखवण्याचे सांगितले, त्यानुसार पोत दाखवत असतांना, एका महिलेने दोन पोती उचलून गळ्याला लावून पहिल्या,त्यातील एक पोत हात चलाखी करून दुसऱ्या महिलेकडे सोपवली,त्यानंतर दुसरी पोत दाखवून ही घ्यायची मात्र काही पैसे कमी असून एटीएम मधून काढून आणतो,तोपर्यंत पोत बाजूला ठेवा The gold texture lengthened असे सांगून दुकानातून पळ काढला.

बराच वेळ झाल्यावर महिला परत आल्याचं नाही,त्यानंतर नरेंद्र सोनार हे स्टॉक तपासत असतांना,एक पोत कमी असल्याचे निदर्शनास आले,त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले,त्यात चोरी झाल्याचे कळले.

याबाबत रावेर पोलिसात अज्ञात महिलांविरुद्ध ३८ ग्राम वजनाची १ लाख ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याघटने दरम्यान दोन मोटारसायकलस्वार पाळत ठेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

चोरी करणाऱ्या संशयित महिला सिसिटीव्हीमध्ये कैद झाल्या असून, रावेर पोलिसांच्यावतीने शोध घेणे सुरू आहे.याबाबत पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सपोनि शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com