अमळनेर- प्रतिनिधी Amalner

तालुक्यातील ६७ ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गावात हादरा बसला असून प्रस्थापीतांना धक्का बसला आहे.

कळमसरे गावात पिंटू राजपूत प्र डांगरी दिनेश शिसोदे शिरूडला भाजपाचे श्याम आहिरे गडखांबला बापू खूशाल पाटील सात्री महेंद्र बोरसे आदी गावांत प्रस्थापीतांच्या पँनलला पून्हा मतदारांनी निवडून दिले आहे.

तर रा कॉ अनिल शिसोदे जिल्हा बँक संचालीका तिलोत्तमा पाटील कॉ चे निंभोराचे सुरेश पिरन पाटील भाजपाचे मूरलीधर महाजन कॉ चे खौशीचे बी के सूर्यवंशी आदिंना आपल्या पँनलच्या ऊमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.

प्र डांगरी प्रभाग क्रमांक २ मध्ये समान २८२ मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीत रा कॉ च्या पँनल ऊमेदवाराचे नाव निघाले सर्वात शेवटी गलवाडे खू मांडळ व अंचलवाडी या ग्राम पंचायतीच्या मतमोजणी निकाल घोषीत झाला सकाळी १० वा सुरू झालेली मतमोजणी प्रक्रीया दु. १ वा. अवघ्या ३ तासात आटोपली तहसिलदार मिलींद वाघ यांनी हि प्रक्रीया यशस्वीपणे राबविली.