फायर, इलेक्ट्रीक ऑडिट न केल्यास हॉस्पिटलची मान्यता होणार रद्द

फायर, इलेक्ट्रीक ऑडिट न केल्यास हॉस्पिटलची मान्यता होणार रद्द

जिल्हा शल्यचिकित्सकांनी बजाविल्या नोटीसा, ॲड.शुचिता हाडा यांनी केली होती मागणी

जळगाव - Jalgaon

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोविड हॉस्पिटल्स कार्यान्वित करण्यात आले असून फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट आणि ऑक्सिजन ऑडीट करण्याची मागणी मनपाच्या माजी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी केली होती. या मागणीची दखल घेवून जिल्हा शल्यकिचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सर्व कोविड हॉस्पिटलला नोटीस बजावून ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑडीट न केल्यास मान्यता रद्द करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

नाशिक, विरार, दिल्ली येथे कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. याची जळगाव शहरासह जिल्ह्यात पुनरावृत्ती होवू नये. यासाठी ऑडीट करण्याबाबतची मागणी ऍड. हाडा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटल्सांना नोटीस बजावली आहे. कोविड हॉस्पिटल्सनी फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट आणि ऑक्सिजनचे ऑडीट करुन त्याची एनओसी दोन दिवसात सादर करावी अशा आशयाची नोटीस बजाविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मान्यता प्राप्त हॉस्पिटल्सना फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट आणि ऑक्सिजनचे ऑडीट करण्यासंदर्भात वारंवार सुचना देवून पत्र देखील देण्यात आले आहेत. मात्र अद्यापर्यंत एनओसी सादर केलेली नाही. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास संबंधित हॉस्पिटलच जबाबदार राहणार असल्याचा इशारा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिलेल्या पत्राद्वारे जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटल चालकांना दिला आहे.नाशिक, विरार, दिल्ली येथे कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. याची जळगाव शहरासह जिल्ह्यात पुनरावृत्ती होवू नये.

यासाठी ऑडीट करण्याबाबतची मागणी ऍड. हाडा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटल्सांना नोटीस बजावली आहे. कोविड हॉस्पिटल्सनी फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट आणि ऑक्सिजनचे ऑडीट करुन त्याची एनओसी दोन दिवसात सादर करावी अशा आशयाची नोटीस बजाविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मान्यता प्राप्त हॉस्पिटल्सना फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट आणि ऑक्सिजनचे ऑडीट करण्यासंदर्भात वारंवार सुचना देवून पत्र देखील देण्यात आले आहेत. मात्र अद्यापर्यंत एनओसी सादर केलेली नाही. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास संबंधित हॉस्पिटलच जबाबदार राहणार असल्याचा इशारा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिलेल्या पत्राद्वारे जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटल चालकांना दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com