कौटुंबिक वादातून पतीने संपविले जीवन

सम्राट कॉलनीत तरुणाची आत्महत्या : एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद
कौटुंबिक वादातून पतीने संपविले जीवन

जळगाव : jalgaon

शहरातील सम्राट कॉलनी (Samrat Colony) येथे लक्ष्मण अशोक जाधव (Laxman Ashok Jadhav) (वय २७) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कौटुंबिक वादातून (family dispute) पत्नी (wife)माहेरी निघून गेल्याने ताणतणावातून लक्ष्मण याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हा सम्राट कॉलनीत पत्नी रुपाली, मुलगा प्रणव (वय ४), आई शर्मिला,भाऊ राम, शुभम असा त्यांचा परिवार असून तिनही भाऊ वेगवेगळे वास्तव्याला आहेत. वडिलांचे निधन झालेले आहे, तर बहिणीचे लग्न झालेले असून ती औरंगाबाद येथे राहते. लक्ष्मण मजुरी करुन तो कुटुंबाला हातभार लावत होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन मुंढे व नाना तायडे यांनी पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.

Related Stories

No stories found.