पिस्तुलाचा धाक दाखवत हॉटेल मालकाची लूट

बुलेटसह पिस्तूल हस्तगत,तिघे संशयित रात्रीतूनच ताब्यात
पिस्तुलाचा धाक दाखवत हॉटेल मालकाची लूट

जळगाव Jalgaon। प्रतिनिधी

शहरातील महाबळ Mahabal परिसरातील बाहेती शाळेजवळ गणेश दुलाराम महाजन Ganesh Dularam Mahajan वय 45 रा. संत गाडगेबाबा चौक, महाबळ या हॉटेल मालकाला तीन जणांनी पिस्तूलाचा धाक Fear of pistols दाखवून त्यांच्याकडील 40 हजार रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती.

या गुन्ह्यात पोलिसांनी गुरुवारी अरबाज दाऊद पिंजारी वय 25, रा. हरिविठ्ठल नगर, अरबाज रऊफ पटेल वय 25 व मुदतसर शेख सलीम वय 25, दोन्ही रा. तांबापुरा या तीन संशयितांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात गणेश दुलाराम महाजन हे पत्नी, एक मुलगा व दोन मुली या परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांचे मालकीचे शहरातील नवीन बसस्थानक येथील साई गजानन पॅलेस नावाने हॉटेल आहे.

त्यावर ते उदरनिर्वाह भागवितात. 17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश महाजन हे नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करुन त्यांच्या दुचाकीने घरी जात हाते. यादरम्यान महाबळ परिसरातील बाहेती शाळेजवळ त्यांच्या मागून एका बुलेटवर तीन जण आले. त्यांनी महाजन यांच्या दुचाकीसमोर बुलेट आडवी लावली.

तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी

तिघांपैकी अरबाज दाऊद पिंजारी याने पिस्तूल काढून महाजन याच्या पोटाजवळ लावले. पिस्तूलाचा धाक दाखवून तुझ्याजवळ किती रुपये आहेत, असे महाजन यांना उद्देशून पिंजारी म्हणाला. त्यानंतर पिंजारी सोबतच्या एकाने महाजन यांच्या खिशातून जबरदस्तीने 40 हजारांची रोकड काढून घेतली.

त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. तर तुला जीवंत ठार मारु, अशी धमकी देवून तिघेही बुलेटवरुन पसार झाले. याप्रकरणी महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी रात्री साडेआठ वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

बुलेटसह पिस्तूल हस्तगत

अटकेतील संशयितांकडून रामानंदनगर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी तपास गुन्ह्यात वापरलेली बुलटे व पिस्तूल हस्तगत केली आहे. पोलीस निरिक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, पोलीस नाईक संदीप महाजन, शिवाजी धुमाळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, प्रदीप पाटील, नरेंद्र वारुळे, जयवंत चौधरी, सुनील दामोदरे, नितीन बाविस्कर, विजय पाटील, राहूल पाटील, प्रितम पाटील यांनी संशयितांना अटक करण्यासह त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बुलटे हस्तगत करण्यास पिस्तूल हस्तगत करण्याची कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com