जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हयात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निडणुका जाहीर होताच ग्रामीण भागात निवडणूक लढवू इच्छिणार्यांना उधाण आले आहे.

आतापासूनच नव्हेतर गेल्या वर्ष दिडवर्षांपासून या हौसे नवसे गवसें कडून याची पूर्वतयारी केली जात होती. ती आता वेग घेऊ लागली आहे.

गेल्या सात आठ महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे हॉटेल, ढाबे, आदी व्यवसायीकाचेे व्यवसाय कोलमडून पडले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे या व्यावसायिकांना पुन्हा उभारी मिळणार आहे.

जिल्हयात 1152 ग्रमापंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात 783 ग्रमापंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात अनेक महत्वाच्या गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावात लोक गटा-गटाने निवडणुकीविषयी चर्चा करताना दिसून येत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात राज्यभर दोन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात हॉटेल व ढाबे चालकांचे मोठे नुकसान झाले होते.

लॉकडाऊन संपल्यानंतर हॉटेल, ढाबे सुरू करण्यात आले. मात्र गिर्हाईकांनी कोरोनाच्या भितीने त्यांच्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे हॉटेल, ढाबे चालू होवूनही ओस पडले होते.

जिल्हा परिसरातील प्रमुख गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने चावडी बैठका, पार्ट्या यांनी जोर धरला असून परिसरातील प्रमुख गावाच्या ग्रामपंचायत निवडणुका हॉटेल व धाबा चालकांनी पर्वणीच ठरणार आहेत.