खाजगी रुग्णालयांनी जास्तीचे बिले आकारली तर कठोर कारवाई

महापालिकेत कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आढावा बैठक
खाजगी रुग्णालयांनी जास्तीचे बिले आकारली तर कठोर कारवाई

जळगाव - JALGAON

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्‍वभूमिवर उपाययोजनांसदर्भात आज बुधवारी वाजता महापालिकेत आमदारांसह महापौरांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरात रुग्णांच्या कॉन्स्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात अशा सुचना आमदारांकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून नियमबाह्य पध्दतीने बिले आकारणार्‍या खाजगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यास कोवीड सेंटरवर रुग्णांना उत्कृष्ट सुविधेसह चांगल्या दर्जाचे जेवण देण्याचा निर्णय झाला.

या बैठकीला शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा उपायुक्त गोसावी , कपिल पवार, विरोधी पक्षनेते सुनील महाजन , नगरसेवक कुंदन काळे ,मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरीष ठुसे , मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलानी, विजय घोलप यांच्यासह खाजगी रुग्णायांचे डॉक्टर आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये कोरोना संदर्भात शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याच बरोबर अनेक उपाययोजनां वर विचार विनिमय करण्यात आला .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com