भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

मुंबई येथील ग्रँट रोड स्थानकारील रेल्वे रुळावर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी स्वत: रेल्वे रुळावर उडी घेत समोरुन येणार्या लोकलला हात देऊन ती ५० फुटांवर थांबवून सहकारी महिला कर्मचार्यांच्या मदतीने प्रवाशाला रुळावरुन उचलून फलाटावर टाकून प्राथमिक उपचार करुन रुग्णालयात दाखल करुन प्रवाशाचे प्राण वाचविण्याचे धाडस करणार्या व या वर्षीचा शौर्य पुरस्काराच्या माणकरी ठरलेल्या येथील लता बोरीकर (बन्सोले) यांचा येथील समाज बांधवांच्या वतीने सत्कार कारण्यात आला.

लता बोरीकर या येथील आदिवासी गोंड, राजगोंड समाजाच्या असून मुंबई येथिल ग्रँट रोड स्थानकावर महिला पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्या या कतृत्वासाठी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शहरात सत्कार कारण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे सरपंच प्रविण मेश्राम होते. हभप योगीश्वर पंडीत भक्ते महराज, जगदिश बन्सोले आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तर लता बोरीकर यांनी प्रोत्साहन पर मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन श्रीकांत सूर्यवंशी यांनी केले. यशस्वीतेसाठी भागवत मानकर, विनायक सूर्यवंशी, सुधीर बन्सोले, रमेश मेशराम, नंदू बोरीकर यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

यापूर्वी पाकलमंत्री गुलाबराव पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांच्यासह अनेस संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.