‘माझी वसुंधरा’चा सन्मान जिल्ह्यासाठी अभिमानास्पद !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार; जिल्हाधिकारी, सीईओंचा सत्कार
‘माझी वसुंधरा’चा सन्मान जिल्ह्यासाठी अभिमानास्पद !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत 2020-21 मध्ये जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी बजावत पुरस्कारांत बाजी मारली, हे कौतुकास्पद आहेच. याशिवाय या अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा मुख्यमंत्री ना. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेला सन्मान जळगाव जिल्ह्यासाठी व पालकमंत्री म्हणून माझ्यासाठीही अभिमानास्पदच बाब असल्याचे गौरोवोद्गार ना.गुलाबराव पाटील यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापालिका पर्यावरण विभागाचे श्री.दिघे, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, विराज कावडिया, अमित जगताप यांच्यासह निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार नामदेवराव पाटील व प्रशासनातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रशासन व पदाधिकार्‍यांमधील उत्कृष्ट समन्वयाचे फळ

पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेला सन्मान म्हणजे जिल्ह्यातील प्रशासन व पदाधिकार्‍यांमधील उत्कृष्ट समन्वयाचे हे फळ आहे. त्याचाच भाग म्हणून कोविडच्या थैमानात देशातील पहिल्या दहामध्ये असलेले जळगाव आता सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी दर असलेला जिल्हा बनला आहे, ही बाब निश्चितपणे आनंददायी आहे.

मी पालकमंत्री नात्याने या कार्यक्रमात सर्वांचे अभिनंदन करतो. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडून कोविड-19 च्या सद्यःस्थितीविषयी माहिती जाणून घेतली.

पुरस्कारामुळे टीमवर्कला मिळाली ऊर्जा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून सर्वाधिक चांगले काम करणे, माझे कर्तव्यच आहे. मात्र, शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदवून त्याचे वेगळेपण ठरणारे मॉडेल निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनातील माझ्या सर्वच सहकारी अधिकार्‍यांनी झोकून देत माझी वसुंधरा अभियानांतर्गत 2020-21 साठीचा पुरस्कार खेचून आणला, ही गौरवाची बाब आहे.

त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे आम्हा सर्व टीमला मिळालेली खरोखर ऊर्जा मी समजतो. आगामी काळातही आम्ही सर्वजण निश्चितपणे चांगले काम करू. कोविडच्या अनुषंगाने आपल्याला पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात आलेले यश ही सुद्धा आपली सर्वांची महत्त्वपूर्ण जमेची बाजू म्हणावी लागेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com