मोटर सायकलला धडक ; तरुण जागीच ठार

पारोळा महामार्ग क्र. ६ वरील घटना
मोटर सायकलला धडक ; तरुण जागीच ठार

पारोळा - श. प्र.

येथे आज दि.10 रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी राष्ट्रीय महामार्ग सहावर सारवे गावाजवळ एका मोटर सायकलला दुसऱ्या मोटर सायकलने धडक दिल्याने यात विटनेर येथील भूषण उर्फ पुंडलिक रामसिंग पाटील (वय 26) या भाजीपाला विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला

याबाबत सोमनाथ प्रेमराज पाटील रा.विटनेर याने फिर्याद दिली की तो त्याचा चुलत भाऊ पुंडलिक रामसिंग पाटील यांचे सोबत पारोळा येथे भाजीपाला व फळ विक्रीचा व्यवसाय करतात. दि.10 रोजी ते दोघे आपल्या मोटर सायकल क्रमांक एम.एच. 19 सी.जी. 8903 ने सकाळी 5 वाजता पारोळा येथे भाजीपाला खरेदी करून घरी परत येत असताना ठीक 7 वाजून 15 मिनिटांनी पारोळा कडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम एच 18 बी एन 3321 ने त्यांच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने त्यांचे वाहन अनियंत्रित होउन खड्डयात जाऊन पडली यात भूषण उर्फ पुंडलिक रामसिंग पाटील यास डोक्यास जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी धडक देणाऱ्या मोटर सायकल स्वाराने आपले वाहन जागीच सोडून फरार झाला. या बाबत अज्ञात आरोपी मोटार सायकल स्वार विरोधात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास प्रकाश चौधरी करत आहे.

https://www.deshdoot.com/local-news/nandurbar-news/murder-of-one-at-arale-the-body-was-thrown-into-a-pot
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com