जळगाव मनपा प्रशासनाची हिटलरशाही

अतिक्रमण निर्मुलन विभागाचे ‘हे वागणं बरं नव्हं’...
जळगाव मनपा प्रशासनाची हिटलरशाही

जळगाव / Jalgaon

मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाची Department of Encroachment Elimination गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाची कारवाई Encroachment action सुरु आहे. मात्र सोमवारी झालेल्या कारवाईत अक्षरशः मनपाची हिटलरशाही Hitlerism of the Corporation सुरु असल्याचे चित्र दिसून आले.

गोरगरीब असलेल्या भाजीपाल्या विक्रेत्या महिलेने आपला माल घेवून जाण्यास मज्जाव करताच, अतिक्रमण पथकातील दोन्ही महिलांनी त्या महिलेला धरुन ठेवले आणि दुसर्‍या कर्मचार्‍याने भाजीपाला ओढाताण करत जप्त केला. त्यामुळे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे ‘हे वागणं बरं नव्हं’... असेच काहीसे म्हणावे लागेल.

भाजीपाला विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईसाठी मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे पथक सुभाष चौक, बोहरा गल्ली, बळीरामपेठ, गांधी मार्केटसमोरील परिसरात सकाळी १० वाजता पोहचले. पथक आल्यामुळे विक्रेत्यांची पळपळ सुरु झाली.

पथकातील कर्मचार्‍यांनी भाजीपाला आणि किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. याच कारवाई दरम्यान, एका भाजीपाला विक्रेत्या महिलेकडे कारवाईसाठी गेले. कारवाईला विरोध करत, त्या भाजीपाला विक्रेत्या महिलेने कारवाई करु नका अशी याचना करत, विरोध दर्शविला.

मात्र अतिक्रमण विभागातील महिला कर्मचार्‍यांनी कोणतीही तमा न बाळगता अगदी हिटलरशाहीप्रमाणे त्या भाजीपाला विक्रेत्या महिलेला पकडून ठेवत, भाजीपाला जप्त केला. तसेच काही दुकानदारांचे साहित्यदेखील जप्तची कारवाई केली. या कारवाईदरम्यान, काही वेळ पथकातील कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये वाद झाला होता.


भाजपाल्यासह हातगाड्या जप्त


मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक ईस्माईल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सुभाष चौक, बोहरा गल्ली, बळीराम पेठ या परिसरात कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कारवाई दरम्यान, भाजीपाल्यासह ंपाच हातगाड्या, सात तराजू काटे आणि अन्य साहित्य तसेच दुकानांसमोरील लटकविलेल्या बेबी सायकल्स्, हातगाडीवरील राख्यादेखील जप्त केल्या. ही कारवाई संजय ठाकूर, नाना कोळी, सतीष ठाकरे, शेखर ठाकूर, सलमान भिस्ती यांच्यासह पथकाने केली.


विक्रेते-अतिक्रमण पथकातील कर्मचार्‍यांमध्ये वाद


कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर निर्बंध असल्यामुळे अनेक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. निर्बंध शिथील झाल्यामुळे विक्रेत्यांनी आपआपला व्यवसाय करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बळीराम पेठ, सुभाष चौकात व्यवसाय करतांना दिसून येत आहे.

सोमवारी सकाळी अतिक्रमण विभागाच्या पथकाने या परिसरात जावून कारवाई केली. काही विक्रेत्यांनी कारवाईला विरोध केल्यामुळे विक्रेते आणि अतिक्रमण पथकातील कर्मचार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com