महामार्गाचे काम संथगतीने

महामार्गाचे काम संथगतीने

जळगाव jalgaon| प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती भागातुन Central part of the city राष्ट्रीय महामार्ग National Highways गेला असल्याने याठिकाणी दररोज महामार्गावरील साईड पट्ट्यांमुळे किंवा जीवघेण्या खड्ड्यांमुळे Because of the deadly pits आतापर्यंत अनेक निष्पापांचे बळी या महामार्गाने घेतला आहे. संतप्त झालेल्या जळगावकरांनी अनेक वेळा आंदोलने केल्यानंतर शासनाने महार्माच्या चौपदीकरणासह ठिकठिकाणी अंडर बायपास Under bypass तयार करण्याचे कामाला सुरुवात केली आहे. कालिंका माता चौफुली ते बांभोरी पुलापर्यंतचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई Delay in work from the contractor केली जात असल्याने महामार्ग चौपरीकरणाचे काम संथगतीने Slowly सुरु असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. महामार्गाच्या दुतर्फा वस्ती असल्याने जीव मुठीत धरुन नागरिकांना ये- जा करावी लागत असल्याने नहीकडून या महार्गावर दादावाडी, प्रभात चौक, गुजराल पेट्रोल पंप व अग्रवाल चौक या चार ठिकाणी अंडरबायपास तयार करण्यात आले आहे. परंतु अग्रवाल चौकातील बायपासची रुंदी कमी असल्याने याठिकाणी भविष्यात वाहनांची कोंडी होण्याची तक्रार जळगाव फस्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

धुळीने बेजार

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महामार्गाच्या विस्ताराचे काम सुरु आहे. याठिकाणी रस्ते खोदून त्याठिकाणी गिट्टी व मुरुम टाकण्यात आला आहे. या महामार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करीत असल्याने उडणार्‍या धूळीमुळे नागरिकांसह वाहनचालक बेजार झाले आहे.

...तर सुटणार वाहतूक कोंडीची समस्या

शहरातूनग गेलेल्या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे महामार्गाची रुंदी देखील वाढणार असल्याने अपघाताचे प्रमाण कमी होवून महामार्गावर होणारी वाहतुकीच्या कोंडीची समस्या देखील सुटणार आहे. परंतु महामाच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती येण्याची आवश्यकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com