पाळधी येथील अतिक्रमण काढण्याला हायकोर्टाचा स्टे
जळगाव

पाळधी येथील अतिक्रमण काढण्याला हायकोर्टाचा स्टे

मालमत्ता धारकांना दिलासा, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली सुनावणी

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

पाळधी गावातून प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५७ जातो सदर रस्त्याच्या दोघे बाजूस अनेक दुकाने व घरे आहेत. सदर मालमत्ता धारकांना दि.२१ जुलै २०२० रोजी सहाय्यक अभियंता श्रेणी-१ सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धरणगाव यांच्या कार्यालयाकडून ८ दिवसाच्या आत अतिक्रमण काढून टाकण्या संदर्भात नोटिसी बजावण्यात आल्या होत्या.

सदर नोटीस महाराष्ट्र महामार्ग कायदा १९५५ अन्वये देण्यात आल्या होत्या. ८ दिवसात सदर बांधकाम मालमत्ता धारकांनी न काढल्यास प्रसंगी पोलीस खात्याची मदतीने सदर बांधकाम हे पाडले जाईल अश्या आशयाच्या नोटीस बांधकाम विभागाकडून सदर मालमत्ता धारकांना देण्यात आल्या होत्या.

सर्व मालमत्ता धारक पूर्वपार सदर मिळकतींचा वापर करतात, अचानक अश्या प्रकारच्या नोटीस आल्याने मालमत्ता धारकमांध्ये प्रचंड दहशतीत होती.

सदर कार्यवाहीला मालमत्ता धारकांचा विरोध असल्यामुळे सुमारे ४० मालमत्ता धारकांनी सदर नोटिशीला हायकोर्टात आवाहन दिले होते. त्यावर सुनावणी होऊन पाळधी गावातील अतिक्रमण काढण्याला हायकोर्टाकडून स्टे देण्यात आला.

सदर मालमत्ता ह्या रहिवासासाठी तसेच सदर मिळकतीत अनेक लोक स्वतःच्या व्यवसाय चालवून स्वतःचा चरितार्थ चालवतात. कोरोना संकटात प्रचंड आर्थिक संकटे जनतेसमोर असताना अश्या नोटीस आल्यामुळे सदर मालमत्ता धारक दोहऱ्या संकटात अडकले होते.

कुठल्याही रस्ता रुंदीकरणाच्या कामात जमीन हवी असल्यास कायद्यात कायदेशीर प्रक्रिया दिलेली आहे. त्याप्रमाणे रीतसर मोजणी करूनच कुठलीही कार्यवाही केली जावी अशी याचिकाकर्त्यांनी मागणी होती. त्याप्रमाणे दि.१९ जुलै रोजी में. हायकोर्टासमोर सुनावणी होऊन सदरचे बांधकाम पाडण्याला स्टे देण्यात आला.

सदर प्रकरणाची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने झाली. सदर प्रकरणात ॲड.जितेंद्र वि.पाटील व ॲड.जी.ए.गाढे यांनी अपिलार्थ्यांच्या बाजूने काम पहिले.

Deshdoot
www.deshdoot.com