चाळीसगाव : पुरग्रस्तांसाठी मायेचा आधार

श्री सत्यसाई मेडिकेअर व डॉ.सुनिल राजपूत यांच्यातर्फे ६५ कुटुंबांना वैद्यकिय मदत, नुसती पाहणी नव्हे तर प्रत्यक्षात मदत
चाळीसगाव : पुरग्रस्तांसाठी मायेचा आधार

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेर्डे व सोनगाव या गावांमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने अनेक कुटुंब बाधित झाली. गुरे, घरे, संसार उपयोगी साहित्य वाहून गेले तर इतर शेतकर्‍यांचे देखील फार मोठे नुकसान झालेले आहे, खेर्डे व सोनगाव गावातील बाधित कुटुंबातील बांधवांसाठी व त्यांच्या परिवारासाठी श्री सत्यसाई आपत्ती व्यवस्थापन, (Medicare Project) मेडिकेअर प्रोजेक्ट व डॉ.सुनील राजपूत (Dr. Sunil Rajput) यांच्या सहकार्याने फिरता दवाखाना म्हणून (Ambulance) अंम्बुलन्सच्या सहाय्याने बधितांना विविध प्रकारचे औषधोपचार व बधितांचा वैद्यकीय उपचार करीत आरोग्य तपासणी करण्यात आली.

डॉ.सुनिल राजपूत यांनी पुरग्रस्त भागाची नुसती पाहणी नव्हेतर प्रत्यक्षात मदत केली. गावातील ६५ गरजू व गरीब कुटुंबांना अमृत कलश या माध्यमातून १४ प्रकारची जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील एक मायेचा आधार म्हणून पुरग्रस्तांसाठी करण्यात आले. तालुक्यातून पुरग्रस्तांनासाठी सर्वात प्रथम वैद्यकिय मदत पोहचविल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

चाळीसगाव : पुरग्रस्तांसाठी मायेचा आधार
Video चाळीसगाव : कन्नड घाट वाहतुकीसाठी महिनाभर बंद ?

याप्रसंगी उपस्थित डॉ.सुनील राजपूत, प.स सभापती अजय पाटील, प.स.सदस्य जिभाऊ आधार पाटील, सरपंच पोपट गणपत पाटील, उपसरपंच विनोद परशुराम पाटील, ग्रा.पं.सदस्य गोकुळ पाटील, मा.सरपंच दीपक पाटीर्ले, पोलीस पाटील अरुण देशमुख मा.पोलीस पाटील उत्तम भिवसन पाटील, बापू पाटील, सत्यसाई सेवा समितीचे राजेंद्र राठी, अजय जोशी, बाळू भाऊ, रघुनाथ महाजन तसेच खेर्डे व सोनगाव गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. डॉ.सुनिल राजपूत यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करुन, ग्रामस्थांची विचारपूस करीत, त्यांना वैद्यकिय मदती दिली. तसेच साथरोगांच्या आजारांबाबत मार्गदर्शन केले. पुरग्रस्तांना वैद्यकिय मदत लागल्यास डॉ.अमित निकुंभ (९१५२३७५५५२), डॉ.जीवन महाजन (९७६३९५५०११), राजेंद्र राठी (८९८३४८२३७७), दीपक पाटील ९८८१२६०२६१), प्रवीण जाधव (७०२०५५८११०), प्रितेश कटारिया (९९७०२९९९०९), अनिल मालपुरे (९८५०४५५७५१), अजय जोशी (९०७५९०७५९१) आदिही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com