जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पाचोऱ्यात, 105 मिमी पाऊस

अंजनी, वाघूरसह तापीकाठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा;
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पाचोऱ्यात, 105 मिमी पाऊस

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टी Heavy rains होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने (Heavy rain) जोरदार बॅटींग केली. त्यामुळे वाघुरसह तापी काठावरील गावांना सतर्कतेचे इशारा दिला आहे. दरम्यान, सायंकाळी हतनूर धरणाचे (Hatnur Dam) 24 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी Collector अभिजीत राऊत (Abhijeet Raut) यांनी दिली आहे.जळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस पाचोरा तालुक्यात झाला. पाचोरा तालुक्यात १०५ मिमी पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस २६ मिमी बोदवड तालुक्यात झाला.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पाचोऱ्यात, 105 मिमी पाऊस
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. सध्या धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले असून यातून 27 हजार 828 क्युसेक तर कालव्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. पूर्णा नदीचे पुर पाणी सायंकाळपर्यंत हतनूर धरणात पोहोचण्याची शक्यता असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडावा लागणार असल्याचे जळगाव पाटबंधारे विभागाने प्रशासनास कळविले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता 232.350 मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे वाघुर धरणाखालील व तापी नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे.नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

अंजनी धरण केवळ 5 फुट रिकामे

एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्पात धरणाची सध्याची पाणी पातळी 52 टक्के असून धरण फक्त 4 ते 5 फूट खाली आहे.सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52 टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने धरणाच्या सुरक्षितेच्यादृष्टीने धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

तालुकानिहाय पाऊस

अमळनेर-56

बोदवड-26

भडगाव-78

भुसावळ-30.8

पाचोरा-105

पारोळा-44

जामनेर-33

चोपडा-54

चाळीसगाव-30

रावेर-38

मुक्ताईनगर-50

धरणगाव-45

यावल-66.3

एरंडोल-60

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com