दमदार पावसामुळे सात प्रकल्प शंभर टक्के भरले
जळगाव

दमदार पावसामुळे सात प्रकल्प शंभर टक्के भरले

शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

Rajendra Patil

मनोहर कांडेकर

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसांमुळे तालुक्यातील सात लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहे.

यात हातगाव एक १०० टक्के, खडकिसीम १०० टक्के, वाघळा एक १०० टक्के, पिंपरखेड १०० टक्के, वलठाण १०० टक्के, क्रिष्णापुरी १०० टक्के, बाणगांव १०० टक्के प्रकल्पाचा समावेश आहे.

तर गिरणा ४० टक्के, मन्याड ५० टक्के, भरले असून ते देखील शंभर टक्के यंदा भरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यंदा तालुक्यात जुर्ले महिन्यात सात प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बाणगाव येथील धरण १०० टक्के पूर्ण भरल्याने तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी धनराज शेलार, दत्तात्रय पाटील, लाला परदेशी, बाप्पू परदेशी, भरत परदेशी, संजय परदेशी, पांडूआबा पवार, सुभाष कारभारी, रावसाहेब शेलार, जिभु टेलर, भाईदास शेलार, विशाल धनराज पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान तालुक्यात आतापर्यंत ४३८ मीमी पावसांची नोंद झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com