Video चाळीसगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, डोंगरी व तितुर नदीला महापूर

कन्नड घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प, मदतकार्य सुरू, शहरात 92 मि.मीटर पाऊस
Video चाळीसगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, डोंगरी व तितुर नदीला महापूर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

चाळीसगाव (chalisgaon )परिसरात ढगफुटी सदृश पाऊस (heavy rainfall)पडून चाळीसगाव शहरातील तितुर नदीसह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने (Flood) वेढले आहे.

Video चाळीसगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, डोंगरी व तितुर नदीला महापूर
photo चाळीसगावात ढगफुटी सदृश्य पाऊस

गवताळा परिसरातील डोंगर भागात रात्रीपासून अचानक जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे तितुर व डोंगरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे जनावरे, शेती औजारे वाहून गेली असून मनुष्यहानी देखील झाली असल्याची माहिती मिळत आहे.

कन्नड घाटात देखील दरड कोसळली

कन्नड घाटात देखील दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. मी स्वतः प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासनाला सोबत घेऊन आज सकाळ पासून बचावकार्यात सहभागी असून, अजून मोठी कुमक मागविण्यात येत आहे.

औरंगाबाद जाण्यासाठी पर्यायी घारगाव रस्ता वापरावा तर औरंगाबादहून येण्यासाठी अजिंठा-जळगाव महामार्ग वापरावा, असे पोलिस निरीक्षक भागवत पाटील, पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.


तालुक्याची पर्जन्यमान स्थिती-

चाळीसगांव - 92 मि.मी, बहाळ - 47 मि.मी. मेहुणबारे - 15 मि.मी., हातले - 80 मि.मी., तळेगांव - 145 मि.मी, शिरसगांव - 70 मि.मी., खडकी- 97 मि.मी._आजचे पर्जन्यमान - 546, सरासरी पर्जन्यमान - 78.00, पर्जन्यमान-690,

Video चाळीसगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, डोंगरी व तितुर नदीला महापूर
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com