Video चाळीसगावात पुन्हा पावसाचा हाहाकार

डोंगरी व तितुर नदीला चौथ्यांदा पुर, दुकाने व घरांमध्ये शिरले पाणी, शेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

पाटणादेवी डोंगर व चाळीसगाव (chalisgaon)परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणार्‍या तितुर व डोगरी नदीला (titur river) पुन्हा चौथ्यांदा पुर आल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेे आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे (heavy rain)डोंगरी व तितुर नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून शहरातील नदीकाठच्या दुकानांमध्ये व बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात पाणी शिरले आहे. अतिपावसामुळे तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर प्रशासनातर्फे नदीकाठाच्या गावांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Video चाळीसगावात पुन्हा पावसाचा हाहाकार
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

अतिवृष्टीमुळे चाळीसगावात यंंदा दि,३१ ऑगस्ट, दि, ७ सप्टेंबर, दि,२४ सप्टेंरबर रोजी तीन पुर येवून गेलेत या पुराच्या नुकसानीच्या जखम ताज्या असताना आज पुन्हा दि,२८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चौथ्यांदा पुर आला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी व तितुर नदीला पुर आल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळेे, शहरातील तीनही पुल पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही बाजुचा संपर्क तुटला आहे. तर शहरातील जवळपास सर्वज कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूर्णता; व्यवहार ठप्प झाले आहेत. आता पासून थांबल्यामुळे रोडावर वाहतुक दिसून येत असून नदीच्या पाण्याची पातळी देखील कमी झाली आहे. तर तालुक्यातील देवळी जवळील पुलावरील भराव वाहुन गेल्याने काही काळ मालेगाव-चाळीसगाव वाहतुक ठप्प झाली होती. परंतू नवीन पुलावरुन वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसीबाबत प्रशासनातर्फे अहवाल घेण्याचे काम सुरु करण्यात आले असून नेमके किती नुकसान झाले यांचा अंदाज संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानतंर मिळणार आहे. दोन्ही नद्या दुथडी वाहत असल्यामुळे प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावाना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.