अपघातात मदत करायला आला अन् महिलेचा मोबाईल लांबविला

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
अपघातात मदत करायला आला अन् महिलेचा मोबाईल लांबविला

जळगाव - jalgaon

शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत (National Highways) असलेल्या नवजीवन सुपरशॉपीजवळ (Navjivan Supershop) महिला दुचाकीसह रस्त्यावर पडून अपघात झाला. यादरम्यान महिलेला मदत करण्याच्या उद्देशातून आलेल्या एका अनोळखी तरुणाने महिलेचा ९ हजार रुपये किंमतीचा मोबाईल (Mobile) लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात (District Police Thane) गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील देवेंद्र नगर येथील रहिवासी जयश्री नागराज पाटील वय ३१ या त्याच्या मोपेड दुचाकीने शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी शहरातील महाराणा पुतळ्याजवळ महामार्गालगत असलेल्या नवजीवन सुपरशॉप परिसरात आल्या होत्या. यादरम्यान त्यांचा दुचाकीवरुन पडून अपघात झाला. यावेळी मदत करण्याच्या उद्देशातून २५ ते ३० वर्ष वयाचा अनोळखी तरुण आला.

यादरम्यान मदत करत तरुणाने जयश्री पाटील यांचा ९ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला. काही वेळानंतर जयश्री पाटील यांना आपला मोबाईल नसल्याचे लक्षात आले. मदत करणार्‍या संबंधित अनोळखी तरुणानेच आपला मोबाईल लांबविला अशी खात्री झाल्यावर जयश्री पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com