चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील हातगाव येथे अनिल सुरेश नागरे (२५) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि,२१ रोजी घडली होती.

सुरुवातीला या प्रकणात पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतू आता मयताच्या भावाने फिर्याद दिल्याने पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

हातगांव येथील अनिल सुरेश नागरे यांनी दि,२१ रोजी हातगाव शिवारातील शंकर बापु सानप यांच्या शेताच्या बांधकावर बाभळीच्या झाडावर दोराचा सहायाने गळफास घेवून आत्महत्या केली होती. मयत शंकर बापु सानप यांच्या घरी घेवून पाच जणांना त्यांची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. तसेच जिवेमारण्याची धमकी दिली. त्यामुळे अनिल नागरे यांनी आत्महत्या केल्याचे त्याच्या भावाने म्हणने आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मयताचे भाऊ प्रदिप सुरेश नागरे यांच्या फिर्यादीवरुन शंकर पांडु सानप, अमोल शंकर सानप, विलास शंकर सानप, मेघा नागरे, बापु बाळकिसन नागरे सर्व रा.हातगाव यांच्या विरोधात भादवी कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.