प्राध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

नवीन शैक्षणिक धोरण रद्दसह विविध मागण्यांसाठी प्रोटान संघटना आक्रमक
प्राध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक धोरण (New educational policy) हे शिक्षण क्षेत्रात खाजगीकरण (Privatization) व बाजारीकरणाला वाव देणारे असून ते रद्द करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार, 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी महासंघाअंतर्गत (National Indigenous Bahujan Employees Federation) प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विंग म्हणजेच प्रोटानतर्फे प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन (Half-naked movement) केले. अंगावरील कपडे काढून आंदोलनात सहभागी प्राध्यापकांच्या या अर्धनग्न आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होेते.

सर्व प्रकारच्या शिक्षण क्षेत्रात शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर्‍या संपविल्या जात आहेत. या खाजगी करणाचा प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात येवून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून जळगाव जिल्हा प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

अशा आहेत मागण्या

सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना लागू करण्यात आलेली अन्यायकारण डीसीपीएस व एन.पी.एस. योजना रद्द करुन पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी, कॅस अंतर्गत पदोन्नती वरिष्ठ महाविद्यालातील प्राध्यापकांना निर्धारीत पात्र दिनांकापासून वेतन वाढ व इतर लाभ देण्यात यावे, प्रत्येक शाळेत ग्रंथपालाची स्वतंत्र नियुक्ती करण्यात यावी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियमित वेतनश्रेणीत सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. किशोर नरवाडे, विलास पाटील, यशरात निकुंभ, प्रशांत लवंगे,मिलिंद निकुंभ, दिनकर पाटील, सुरेश ठाकूर, प्रा.डॉ. प्रकाश कांबळे, ए.झेड. बागुल, गणेश काकडे, आर.बी.परदेशी, प्रकाश इंगळे, विलास चिकने, प्रमोद तायडे, आनंद त्रिभुवन, जितेंद्र रायसिंग, यशराज निकम, शांताराम तायडे, आदींचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.