हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

जळगाव - Jalgaon :

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराने दि.२४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास निधन झाले.

मृत्यू समयी त्यांचे वय ७० होते.त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. हाजी गफ्फार मलिक यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना जळगावातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

मात्र उपचाराआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. गफ्फार मलिक यांच्या निधनाची वार्ता पसरताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

तत्कालीन जळगाव नपाचे ते सभापती होते. इकरा उर्दू एज्युकेशन सोसायटीचे सचिव, अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष, मुस्लिम इदगाह कब्रस्थानचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुली असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com