Video यावल : श्री व्यास मंदिरात गुरूपौर्णिमा साध्या पध्दतीने
जळगाव

Video यावल : श्री व्यास मंदिरात गुरूपौर्णिमा साध्या पध्दतीने

भाविकांना घेता येईल ऑनलाईन दर्शन

Rajendra Patil

यावल - प्रतिनिधी

सालाबादाप्रमाणे दरवर्षी भाविक भक्तांच्या उपस्थित श्री व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो परंतु यावर्षी संपूर्ण जगावर करोना महामारीचे संकट आलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव साध्या व सरळ पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे

सकाळी आठ ते दहा वाजे पावेतो महापूजा करण्यात येणार आहे. याचे थेट प्रक्षेपणाद्वारे फेसबुकच्या माध्यमातून आपल्या घरात बसून दर्शन घेता येईल.

यासाठी कृपया कोणीही भाविकांनी पाच जुलै रविवार 2020 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री व्यास मंदिरात दर्शनासाठी येऊ नये सर्व भाविक भक्तांनी फेसबुक व व्हाट्सऍप ग्रुप वर व्यास महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री व्यास मंदिर व श्री राम मंदिर संस्थान समिती यावल यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com