माध्यमांमुळेच मी मोठा झालो, आज मंत्री आहे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील : ‘देशदूत’चे उपसंपादक किशोर पाटील यांचा गौरव
माध्यमांमुळेच मी मोठा झालो, आज मंत्री आहे !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना महामारीने अनेकांची मानसिकता बदलली कोणाशी दोन हात करण्यासाठी राजकीय पुढार्‍यांसह प्रशासकीय अधिकारी असे सर्वच यंत्रणा मैदानात उतरली होती.

त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. माध्यमेही समाजाचा आरसा असतात चुकलं तर मार्गदर्शन करतात या माध्यमांमुळेच मी मोठा झालो असुन आज या पदावर असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुुुंबई यांच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पत्रकारितेतील आतापर्यंतच्या योगदान कामगिरी बद्दल लोकमत संपादक मिलिंद कुलकर्णी यांना मूकनायक तर ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्काराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शाल, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पत्रकारांचाही कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यात देशदूतचे उपसंपादक किशोर पाटील यांचाही कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर भारती सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे , माजी मंत्री गिरीश महाजन ,आमदार सुरेश भोळे, जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण, अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद , धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे, लोकमत चे संपादक मिलिंद कुलकर्णी तसेच ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे यांची उपस्थिती होती.

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके , जीएम फाऊंडेशनचे आरोग्यदूत अरविंद देशमुख , लोकमतचे सचिन पाटील, सकाळचे संदीप वानखेडे, पत्रकार भूषण महाजन लोकमतचे जामनेर येथील वार्ताहर मोहन सारस्वत , पहूर येथील शंकर भाले ,अमळनेर येथील भानुबेन शहा , संदीप घोरपडे, देशदूतचे उपसंपादक किशोर पाटील, टीव्ही नाईनचे अनिल केर्‍हाळे, एबीपी माझाचे चंद्रशेखर नेवे, दिव्य मराठीचे आबा मकासरे, आरोग्यदूत भूषण पाटील, गजानन सूर्यवंशी , संजय सोनवणे, लाईव्ह ट्रेंडचे जितेंद्र कोतवाल, इबीएम न्युजचे जुगल पाटील आकाश धनगर , ई टीव्ही भारतचे प्रशांत भदाणे , लोकमतचे आनंद सुरवाडे , लोकमतचे चाळीसगाव वार्ताहर जिजाबराव वाघ यांचाही सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले. सूत्रसंचालन डिगंंबर महाले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, विभगीय अध्यक्ष किशोर रायसाकडा ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके,, जिल्हा संघटक भगवान मराठे, मिलिंद लोखंडे, नरेश बागडे, भूषण महाजन , कमलेश देवरे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com