जिल्ह्यात 12 कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना मान्यता !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
जिल्ह्यात 12 कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना मान्यता !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मार्च 2021 अखेरीस जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात 10 कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

शहरी विभागासाठी 8 अग्निशमन गाड्या खरेदीसाठी 2 कोटी 31 लाखांच्या निधीस मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील अनेक नाविन्यपूर्ण 12 कोटीचे नाविन्यपूर्णमधून कामे होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

8 अग्निशमन गाड्यांची होणार खरेदी

जिल्ह्यात मनपा व नगरपालिका अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेत अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्यासाठी खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना धरणगाव, पाचोरा, भडगाव,चोपडा,पारोळा,अमळनेर, जामनेर, शेंदुर्णी या 8 शहरात प्रत्येकी सुमारे 30 लक्षप्रमाणे 2 कोटी 31 लाखांचा निधी लहान अग्निशमन गाड्या खरेदीसाठी मंजूर केला असून लवकरच 8 गाड्यांची खरेदी होणार आहे.

असे आहेत नाविन्यपूर्ण कामे

बहुउद्देशीय डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा, अभ्यासिका बांधकाम, महिला बचत गटासाठी सभागृह,जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडिट, स्मशानभूमी तसेच चौका चौकात सिमेंट बाक, रस्त्यालगत व नदी-नाल्यावर संरक्षक भिंतीचे काम, शवपेट्या, गावहाळ, ओपन जिम व लोखंडी बाक व सार्वजनिक शौचालय बांधकामांचा समावेश आहे. जिल्हा विकासाच्या इतर योजनेतून जी कामे घेता येत नाही, अशी कामे नाविन्यपूर्ण योजनेतून घेता येतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com