चाळीसगाव तालुक्यात पूर परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश
चाळीसगाव तालुक्यात पूर परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

चाळीसगाव Chalisgaon शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे Due to heavy rains तितूर व डोंगरी या नद्यांसह Titur and Dongri rivers नाल्यांना मोठा पूर Flood आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रारंभीच्या माहितीनुसार वाकडी येथील 60 वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. याबरोबरच शेकडो जनावरे वाहून गेली असून अनेक जनावरे जागेवरच मृत्यूमुखी पडले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील Guardian Minister Gulabrao Patil यांनी पूरपरिस्थितीची पाहणी Flood monitoring केली असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले आहे.

सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती होवून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे परिसरातील तितूर, डोंगरी या नद्यांना पूर आला. या पुराचे पाणी नदी काठावरील गावांमध्ये व घरांमध्ये शिरले. त्यामुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज चाळीसगाव शहरासह वाकडी या गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची माहिती देऊन नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांचेसोबत खासदार उन्मेष पाटील, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा

पालकमंत्री वाकडी येथे नुकसानीची पाहणी करीत असतानाच चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेशी दूरध्वनीवर संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश देऊन शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजीमंत्री गिरीश महाजन यांचेशीही संवाद साधला.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण

ढगफुटीसारख्या परिस्थितीमुळे तितूर व डोंगरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तितूर नदीच्या तीनही पुलावरून पाणी वाहत असल्याने नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आला असून मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.

तुकडीकडून मदत कार्याला सुरुवात

राज्य आपत्ती प्रतिसाद तुकडीच्या दलाकडून औट्रम घाटात मदतकार्य सुरू आहे. चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी आदी गावांतील नदी काठावरील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश

पूर परिस्थितीनंतर साथीचे आजार पसरू नयेत याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावयाची आहे. त्यासाठी जल शुध्दीकरण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. पूरग्रस्त भागात वैद्यकीय अधिकार्‍यांची पथके तैनात करून नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

खासदारांकडे आमदारांकडून पाहणी

चाळीसगाव शहरातील अतिवृष्टीची आज सकाळी खा. उन्मेष पाटील, आ. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढ, यांनी पाहणी केली. त्यांनी औट्रम घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहने अडकली आहेत. त्यातच पाऊस सुरू आहे. या घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. असे असले, तरी औट्रम घाटातील राडारोडा तातडीने दूर करीत घाट मार्ग वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्यात येईल, असे महामार्ग विभागाने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com