जलसंपदा मंत्री असतांना तापी महामंडळात काय बोंब पाडली

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आ.गिरीश महाजनांवर टीका
जलसंपदा मंत्री असतांना तापी महामंडळात काय बोंब पाडली

जळगाव - Jalgaon

आमदार गिरीश महाजन हे जलसंपदामंत्री होते.त्यांनी तापी महामंडळात काय बोंब पाडली.किती पैसे दिले.ज्या निम्न तापी प्रकल्पावर जिल्ह्यातील पाच तालुके अवलंबून आहे. त्यासाठी एक दमडा दिला नाही.बलून- बलून अजून तो फुगा हवेतच आहे.त्या फुग्याकडे कोणी पाहिले नाही.जलसंपदामंत्री असतांना हा जिल्हा सुजलाम- सुफलाम पाणीमय केला असता, पण विना पाण्याचा सुक्का जिल्हा करुन टाकला अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार गिरीश महाजन यांच्यावर रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत टीका केली.आमदार महाजन हे तापी प्रकल्पासाठी एक रुपया देवू शकले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी.आम्ही तरी १३२ कोटी आणले.आम्ही कृतीने बोलतो.त्यांनी कृतीने उत्तर द्यावे असे आव्हान देखील ना.पाटील यांनी आमदार महाजन यांना दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार गिराश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मागील काळात भाजपची सत्ता होती. त्यावेळी चंद्रकात पाटील आणि गिरीश महाजन हे पालकमंत्री होते. मी वर्षभरात डीपीडीसीतून ६१ कोटी देवू शकतो. तर त्यांनी प्रत्येक वर्षी तीस-तीस कोटी जरी ४ वर्षात दिले असते तरी शहराचा विकास झाला असता.केवळ त्यांनी शंभर कोटी,दीडशे कोटी निधी देवू म्हणून वल्गणा केली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

संकटमोचक नावाचा कार्यक्रम वाजवून घेतला
जिल्हा नियोजन मंडळाच्या स्थापनेपासून ९७ टक्के निधी खर्च करणारा पहिला पालकमंत्री होण्याचा मला अभिमान आहे.यापूर्वी कोणीही खर्च केलेला नाही.चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी डिपीडीसीतून किती खर्च केला असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.मी कधीही भेदभाव केला नाही. विकासाकरीता पैसे दिले पाहिजे. यापूर्वी आपल्या पक्षाचा आहे का?असे बघितले गेले आहे. मात्र आम्ही तसे केले नसून सर्वांना निधी दिला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.आमच्यावर टीका करता मात्र निष्क्रीय कोण होते . संकटमोचक नावाचा कार्यक्रम वाजवून घेतला .जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही असे असा आरोप गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर केला.

डीपीडीसीतून मनपाला ६१ कोटींचा निधी मंजूर
शहराच्या विकासकामांबाबत जनतेचा पदाधिकारी व नगरसेवकांवर रोष आहे.मागील काळात आश्‍वासन दिली गेलीत मात्र कामे झाली नाहीत. मनपात सत्तांतर झाले. डीपीडीसीच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या निधीतून सर्वांगिण विकासकामे केली जाणार अहेत.

या निधीतून केवळ सत्ताधारी नगरसेवकांच्याच नव्हे तर विरोधकांच्याही प्रभागातील कामे केली जातील असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर जयश्री महाजन,उपमहापौर कुलभूषण पाटील,नितीन लढ्ढा,सुनील महाजन,नितीन बरडे,बंटी जोशी,विण्णू भंगाळे,प्रशांत नाईक,महानगराध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार गिराश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मागील काळात भाजपची सत्ता होती. त्यावेळी चंद्रकात पाटील आणि गिरीश महाजन हे पालकमंत्री होते. मी वर्षभरात डीपीडीसीतून ६१ कोटी देवू शकतो. तर त्यांनी प्रत्येक वर्षी तीस-तीस कोटी जरी ४ वर्षात दिले असते तरी शहराचा विकास झाला असता.केवळ त्यांनी शंभर कोटी,दीडशे कोटी निधी देवू म्हणून वल्गणा केली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

संकटमोचक नावाचा कार्यक्रम वाजवू घेतला
जिल्हा नियोजन मंडळाच्या स्थापनेपासून ९७ टक्के निधी खर्च करणारा पहिला पालकमंत्री होण्याचा मला अभिमान आहे.यापूर्वी कोणीही खर्च केलेला नाही.चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी डिपीडीसीतून किती खर्च केला असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.मी कधीही भेदभाव केला नाही. विकासाकरीता पैसे दिले पाहिजे. यापूर्वी आपल्या पक्षाचा आहे का?असे बघितले गेले आहे. मात्र आम्ही तसे केले नसून सर्वांना निधी दिला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.आमच्यावर टीका करता  मात्र निष्क्रीय कोण होते . संकटमोचक नावाचा कार्यक्रम वाजवून घेतला .जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही असे असा आरोप  गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर केला.

डीपीडीसीतून मनपाला ६१ कोटींचा निधी मंजूर
शहराच्या विकासकामांबाबत जनतेचा पदाधिकारी व नगरसेवकांवर रोष आहे.मागील काळात आश्‍वासन दिली गेलीत मात्र कामे झाली नाहीत. मनपात सत्तांतर झाले. डीपीडीसीच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या निधीतून सर्वांगिण विकासकामे केली जाणार अहेत. या निधीतून केवळ सत्ताधारी नगरसेवकांच्याच नव्हे तर विरोधकांच्याही प्रभागातील कामे केली जातील असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर जयश्री महाजन,उपमहापौर कुलभूषण पाटील,नितीन लढ्ढा,सुनील महाजन,नितीन बरडे,बंटी जोशी,विण्णू भंगाळे,प्रशांत नाईक,महानगराध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com