जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा नोकरांची सहकारी संस्था अर्थात ग.स सोसायटीच्या सत्ताधारी 5 व विरोधातील 9 अशा 14 संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर ग.स.चे संचालक मंडळ अल्पमतात आले होते.

त्यामुळे आज 2 फेब्रुवारी रोजी ग. स सोसायटीवर प्रशासक बसविण्याचे आदेश पारीत झाले आहे. प्रशासक म्हणून व्ही.एम.गवळी, प्रशांत विरकर, व भाऊसाहेब महाले हे उद्या दि. 3 रोजी सकाळी 10 वाजता मुख्य कार्यालयात पदभार घेणार आहे.

ग.स.सोसायटीत विद्यमान अध्यक्ष मनोज पाटील यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत सत्ताधारी लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर,उपाध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह पाच संचालकांनी व सहकार गटातील 9 संचालकांनी गेल्या आठवड्यातच राजीनामे दिले होते.

तसेच जिल्हा उपनिंबधकांकडे गस सोसायटी अल्पमतात आली असल्याने प्रशासक नेमण्याची मागणी देखील केली होती.

त्यानुसार आज जिल्हा उपनिबंधकांनी गस सोसायटीवर तीन अधिकार्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली असुन हे प्रशासक दि.3 रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्य कार्यालयात पदभार घेणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

सहकारच्या निवडणूका होणार

दुसरीकडे शासनाच्या सहकार व पणन विभागाकडून सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश आज मंगळवार, 2 रोजी देण्यात आले आहे. सहकारी संस्थाना 31 मार्च पर्यंत

मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र मात्र मुदतवाढीचे 16 जानेवारीचे आदेश रद्द करण्यात आले असून निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.