जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

ग.स. सोसायटीच्या सत्ताधारी लोकसहकार गटातील 5 संचालकांसह विरोधी गटातील 9 अशा 14 संचालकांनी गुरुवारी राजीनामे दिले.

त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांनी संस्थेचा 6 शिपाई कर्मचार्यांना लिपीक पदावर पदोन्नत्या दिल्या आहे.

संचालक मंडळाची मान्यता नसताना या पदोन्नत्या बेकादेशिर आहे. याबाबत संचालकांंनी उपनिबंधकांकडे शुक्रवारी तक्रार केली आहे.

ग.स. सोसायटीच्या संचालकांनी राजीनामे दिल्याने अध्यक्ष अल्पमतात आले असतांना दि.28 जानेवारी रोजी अध्यक्षांनी सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर कार्यालय उघडून 6 शिपायांच्या पदोन्नत्यांचे आदेश काढले आहे.

कर्मचारी बदल्यांच्या आदेशाला कार्यकारी मंडळाची आवश्यकता असतांना ती घेण्यात आली नसल्याने त्यांनी पदाचा गैरवापर करणे सुरू असल्याचा आरोप उदय पाटील यांनी केला आहे.

15 रोजी संचालक उदय पाटील यांनी ईतीवृत्ताची मागणी केली असता ते देण्यात आले नाही. यावरून ईतीवृत्तात खाडाखोड करून चुकीचे व बनावट ईतीवृत्त लिहून घेण्याची शक्यता देखील निवेदनात व्यक्त केली आहे.

यांना दिल्या पदोन्नत्या

ग.स.च्या 8 शिपायांना लिपीक पदावर पदोन्नत्या अनाधिकृतपणे देण्यात आल्या आहे. त्यात सुनील भोई, योगेश पवार, प्रकाश पारधी, पितीष सैंदाणे, मालती सोनवणे, प्रविण सरदार, सिध्दांत बिर्हाडे, दीपाली शिरसाठ यांचा समावेश असुन त्यावर 27 जानेवारी रोजी अध्यक्षांनी पदोन्नत्यांचे आदेश पारीत केले आहे.