शिक्षकांच्या समस्यांसाठी तक्रार निवारण सभा घेणार

जळगाव पं.स.सभापती ललिता पाटील यांचे शिक्षक सेनेच्या पदाधिकार्‍यांना आश्वासन
शिक्षकांच्या समस्यांसाठी तक्रार निवारण सभा घेणार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच तक्रार निवारण सभा घेण्यात येईल, असे आश्वासन जळगाव पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती ललीता पाटील यांनी शिक्षक सेनेच्या तालुका पदाधिकार्‍यांना दिले.

जळगाव पंचायत समितीसभापतीपदी ललीता जनार्दन पाटील यांची नुकतीच निवड झाली, त्यांचा सत्कार जळगाव तालुका शिक्षकसेनेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि सभापती यांचे पती जनार्दन पाटील यांचादेखील सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार, जळगाव तालुकाध्यक्ष राजू पाटील उमाळेकर, तालुका सरचिटणीस निळकंठ चौधरी, कार्याध्यक्ष नितेश कोळी, कोषाध्यक्ष संतोष वानखेडे, ज्येष्ठ सल्लागार लिलाधर सपकाळे, मिलींद कोल्हे, अरूण सोनवणे, लक्ष्मण सपकाळे, किशोर पाटील, सुदाम बडगुजर, नितीन धांडे, यतीन साळुंखे, ज्योती वाघ, टिना सोनवणे, विश्वास ठाकूर, सतिष सैंदाणे, प्रकाश साळुंखे, नाना ठेलारी, सुभाष पारधी, अविनाश पाटील, सुनिल पोळ, तुषार सोनवणे, असिम मन्सूरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी सभापती ललीता पाटील यांनी प्रलंबित शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच शिक्षक तक्रार निवारण सभा घेण्यात येईल आणि चर्चेतून शिक्षकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येईल,असे त्यांनी आश्वासित केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार यांनी मानले.

शिक्षकांकडून घरोघरी सर्व्हेक्षण

कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी घरोघरी नागरिकांचे सर्व्हेक्षणासह शासनाच्या विविध पातळीवर शिक्षकांनी काम केले. शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून अविरतपणे काम केले.मात्र,त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या दरम्यान, काही शिक्षक कोरोनाबाधित झाले. तर काहींना कोरोनाशी लढा देताना प्राणही गमवावे लागले. अशा शिक्षकांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचा निधी त्वरित देण्यात यावा, यासह विविध शिक्षकांच्या मागण्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com