धरणगाव पं.स.च्या विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाला लाच घेतांना अटक

परीसरात खळबळ
धरणगाव पं.स.च्या विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाला लाच घेतांना अटक

धरणगाव Dhrangaon (प्रतिनिधी) -

येथील पंचायत समितीचा विस्तार अधिकारी आणि कंडारी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक यांना 2000 रु. ची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने चोपडा येथे रंगेहात पकडले. या घटनेने धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, सुरेश शालिग्राम कठाळे (वय-51, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, धरणगाव, रा.गंगूबाई नगर, पारोळा) तसेच कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-45,ग्रामसेवक, ग्रामपंचायत, कंडारी बुद्रूक ता.धरणगाव, रा. बोरोले नगर,चोपडा) या दोघांनी तक्रादाराकडून 2 हजाराची लाच स्वीकारली म्हणून त्यांना अटक करण्यात आली.

तक्रारदार हे ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणुन नोकरीस आहेत. त्यांचे सन-2015-16 या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेले होते. सदर जादा देण्यात आलेल्या रक्कमेची परतफेड करणेबाबत तक्रारदार यांना नोटीस आलेली होती. सदर नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषद, जळगाव येथे पाठवावा यासाठी सुरेश कठाळे आणि कृष्णकांत सपकाळे या दोघांनी प्रत्येकी 1 हजार रूपये असे एकुण 2,000 रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. तसेच सदर लाचेची रक्कम ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळेने हॉटेल मानसी, चोपडा येथे पंचासमक्ष स्वीकारली. तेव्हा या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली.

याप्रकरणी शशिकांत श्रीराम पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय संजोग बच्छाव, सफौ. दिनेशसिंग पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोहेकॉ. शैला धनगर, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ . महेश सोमवंशी, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ .ईश्वर धनगर, पोकॉ. प्रदिप पोळ यांनी कार्यवाही केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com