जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीतून ग्रामपंचायतींना कर्ज देण्यात आले होते.परंतु, काही ग्रामपंचायतींनी थकबाकी अद्यापी भरलेली नाही.

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील 56 ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जि.प.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कर्ज देण्याची योजना असून सन 1980 पासून ते आजपर्यत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी कर्ज घेतलेले आहे.

यापूर्वी ग्रामपंचायतींना पुरेसा निधी नसल्याने बहुतांश ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी अंतर्गत कर्ज घेतलेे. मात्र, काही ग्रामपंचायतींनी मुदतीत कर्ज फेडलेले नसल्याने नाही. वर्षानुवर्ष या थकबाकीकडे दुर्लक्ष झाल्याने 21 कोटीवर कर्ज थकीत आहे.

आता ज्या ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीचे कर्ज अद्यापी भरलेली नाही. ग्रामसेवकांना वारंवार सूचना देवूनही त्या गावातील ग्रामसेवकांनी याकडे कानाडोळा केला आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील 56 ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.

ग्रामनिधी थकबाकीप्रकरणी यापूर्वी 105 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र, त्यापैकी 55 ग्रामसेवकांनी खुलासासह काही थकीत रक्कमेचे धनादेश जिल्ह्यातील गटविकास अधिकार्यांकडे जमा करण्यात आले आहे.

तर काहींनी कर्ज फेड करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील 56 ग्रामसेवकांना जि.प.प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत