जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हयात 783 ग्रामपंचायत क्षेत्रात होणार्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राची तयारी करण्यात आली आहे.

783 ग्रामपंचायतींच्या 2670 प्रभागासाठी 2हजार 465 केन्द्रावर मतदान प्रकिया पार पाडण्यात येणार आहे.

सर्वात जास्त मतदान केन्द्रांची संख्या पाचोरा तालुक्यात 295 तर सर्वात कमी बोदवड तालुक्यात 80 मतदान केंद्र संख्या आहे.

तालुकास्तरावर प्रशिक्षण

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्र अध्यक्षांसह मतदान अधिकारी व कर्मचार्याचीं नेमणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान तालुकानिहाय तीन टप्प्यांमध्ये कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.