तिसरी लाट ; शासन अध्यादेशाने बालकांच्या जिवाला धोका!

बँकेत खाती उघडण्यासाठी, आधार कार्डसाठी होत आहे गर्दी
तिसरी लाट ; शासन अध्यादेशाने बालकांच्या जिवाला धोका!
USER

दिग्विजय सूर्यवंशी

शेंदुर्णी ता.जामनेर Jamner

मे महिन्याच्या शालेय पोषण आहाराची रक्कम सरळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते (Bank account) उघडण्याचा अध्यादेश शिक्षण विभाग व शालेय पोषण आहार अंतर्गत जारी करण्यात आलेला आहे . त्यामुळे पालक वर्ग लहानग्यांना घेऊन बँका व आधार कार्ड (Aadhaar card) केंद्राच्या खेटा मारताना दिसत आहे . तसेच कोव्हीड (Covid-19) आणि तिसरी लाट ही लहान बालकांवर सांगितलेली असतानाही असा अध्यादेश शासनाने अध्यादेश काढून बालक पालक यांना वेठीस धरले आहे याबाबत पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

काय आहे अध्यादेश

केंद्राच्या शालेय पोषण आहारा अंतर्गत मे महिन्यातील उन्हाळी सुटीतील विशेष कल्याणकारी उपाय म्हणुन पात्र लाभार्थ्यांच्या शालेय पोषण आहारा इतकी रक्कम डायरेक्ट खात्यावर जमा करण्यात येणार असून 100 टक्के प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यात यावे. याची अंमलबजावणी जिल्हा तालुका आणि शालेय स्तरावर करण्यात यावी तसेच शाळांनी पालकांना सूचना करून विद्यार्थ्यांची बँक खाते उघडून घेण्यात यावे.

याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि त्याची माहिती संबंधित कार्यालयाला कळवावे. अध्यादेश शालेय शिक्षण विभाग प्राथमिक यांनी दिनांक 25 जून रोजी संबंधित विभागांना जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्हा तालुका स्थरावरून शालेय पोषण आहार योजनेतील अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना पत्राद्वारे कळविले आहे. तसेच संबंधित शाळांनी नव्याने दाखल झालेले विद्यार्थी वरच्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आलेले नाहीत त्यांनी त्वरित बँक खाते उघडणे परमान काढले आहे .

कोव्हीडची तिसरी लाट बालकांवर!

कोव्हिडची आणि तीसरी लाट हि बालकांवर परीणाम करणारी असल्याचे तज्ञांनी जाहीर केलेले आहे. तसेच पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांनी जवळचे अप्त स्वकीय गमावलेले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पालकही आपल्या मुलांच्या आरोग्याची खबरदारी घेत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बँकेमध्ये बँक खाते खोलण्यासाठी मुलांना नेणे कितपत योग्य आहे! असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.

आधार अपडेट (Aadhaar update) आणि बँक खाते उघडण्यासाठी पालकांची गर्दी

शाळेने पालकांना दिलेल्या सूचनांनुसार पालक आपल्या पाल्याचे बँक खाते उघडण्यासाठी बँकांच्या चकरा मारत आहे. तसेच नव्याने पहिली दुसरी मध्ये दाखल झालेल्या लहानग्यांचे आधार वरील थंब अपडेट आणि इतर दुरुस्तीसाठी आधार केंद्रांवर लहान मुलांसोबत गर्दी करताना दिसत आहे. त्यातही काही बँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे बँक खाते उघडण्यात अडथळे येत आहेत. परंतु कोव्हीड तिसरी लाट आणि बँक खाते खोलण्यासाठी लहानग्यांना घेऊन बँकांमध्ये होणारी गर्दी बघता तिसरा लाटेचे निमंत्रण हे खुद्द शासनाच्या आदेशाने शासनाच्याच अधिकाऱ्यांनी दिलेले आहे असे मत काही जाणकार व्यक्त करीत आहे .

एका महिन्यासाठी बालकांचे आरोग्य धोक्यात

शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेमधून पालकांना वितरित करण्यात येते परंतु फक्त मे महिन्याच्या शालेय पोषण आहारात ऐवजी थेट रक्कम बँक खात्यात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकण्याचा खटाटोप कशासाठी. यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाऊन बालकांना करुणा ची लागण झाल्यास याची जबाबदारी संबंधित अधिकारी घेणार आहेत का ? असा थेट सवाल पालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

शाळांमधूनच रक्कम अदा करा !

फक्त एक महिन्याच्या शा पो आ साठी बँक खाते उघडण्याची ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही त्यांना शालेय पोषण आहाराच्या धान्या सारखीच थेट रक्कम शाळांमधून वितरित करण्यात यावी असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे .

शासनाचे डोके ठिकाणावर आहे का?

कोरोनाची (Corona) तिसरी लाट रोखण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे . तसेच वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहेत . तर काहींना बेरोजगारीला सामोरे जावे लागले आहे. असे असतानाही मोठ्या उमेदीने जागतिक महामारी ला रोखून मोठ्या उमेदीनेनव्याने आयुष्य सुरू करण्या साठीसर्वच प्रयत्नशील आहे. अशामध्ये बालकांना सार्वजनिक ठिकाणी पाठवून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला एक पगारे आमंत्रणच देण्याचे काम शासनाच्या आदेशाने शासनाचे अधिकारी करीत आहे. त्यामुळे पालकांमधून एकच संतप्त सवाल उपस्थित होत आहे शासनाचे डोके ठिकाणावर आहे का?

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com