जळगाव बाजार समितीच्या संकुल बांधकामाची शासनाकडून चौकशी

जळगाव बाजार समितीच्या संकुल बांधकामाची शासनाकडून चौकशी

चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत : अ‍ॅड. विजय पाटील यांची माहिती

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कृृषी बाजार समितीतील व्यापारी संकुल बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत अ‍ॅड. विजय पाटील यांच्या तक्रारीनुसार शासनाने तीन सदस्यांची समिती नियुक्ती केली असून संंबंधित बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच समितीने संबंधित प्रकरणाची चौकशी करुन 30 दिवसात अहवाल सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे.

अ‍ॅड. विजय पाटील यांनी शासनाकडे केलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी संकुलाच्या गैरव्यवहारप्रकरणी शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात येवून बाजार समितीतील व्यापारी संकुलाच्या बांधकामा झालेल्या गैरव्यवहाराच्या बाबतच्या चौकशीसाठी शासनाकडून तीन सदस्यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश आज 18 मे रोजी शासनाने काढेल आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन, मंडळाचे नाशिक येथील विभागीय कार्यालयाचे विभागीय सरव्यवस्थापक सी.एम.बारी हे समितीप्रमुख असून सदस्य म्हणून पणन विभागीय कार्यालय नाशिक येथील कनिष्ठ अभियंता हेमंत अत्तरदे, व जळगाव येथील सहाय्यक निबंधक व्ही.एम.गवळी यांचा समितीत समावेश आहे.

दरम्यान या आदेशात बाजार समितीच्या बांधकामात कोण कोणती अनियमितता झाली, त्यास कोण जबाबदार, यासह तक्रारीनुसार इतर सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करुन शासनास 30 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही शासनाकडून देण्यात आलेले आहेत. व व्यापारी संकुलाचे बांधकाम त्वरीत थांबविण्याची समितीने कार्यवाही करावी, असेही म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com