युवक-युवतींना नोकरीची सुवर्णसंधी
जळगाव

युवक-युवतींना नोकरीची सुवर्णसंधी

रोजगार मेळाव्याचे आयोजन

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे 25 ते 27 ऑगस्ट, 2020 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, हा मेळावा...

जळगाव जिल्हा व जिल्ह्याबाहेरील आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी देऊ केली आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 310 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहेत.

यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींकरीत जास्तीत जास्त उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलला लॉग-इन करुन लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा, असे श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com